यूपीएससी निकालातून “सारथी’चे महत्त्व अधोरेखित; खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई – “सारथी’मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना युपीएससीसारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि सारथी संस्थेमार्फत युपीएससीसाठी फेलोशिप दिलेल्या 21 विद्यार्थ्यांची युपीएससीत वर्णी लागली आहे. हाच धागा पकडत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सारथी संस्थेचे महत्व अधोरेखित करणारे ट्‌विट केले आहे. या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, युपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झालेल्यांपैकी तब्बल 21 उमेदवार हे “सारथी’च्या योजनांचे लाभार्थी आहेत.

“सारथी’मुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना युपीएससीसारख्या परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, हे यातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्था देखील महत्त्वाची आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. याचसाठी सारथी संस्थेच्या विकासाकरिता मी लढा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.