मंदीचे भारतावरील परिणाम स्पष्ट जाणवताहेत – आयएमएफ प्रमुख 

वॉशिंग्टन – जगभरातील अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. परंतु, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थ्येवर मंदीचा परिणाम स्पष्ट दिसून येत आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जियॉरजीवा यांनी म्हंटले आहे. ऐन निवडणुकीत क्रिस्टालिना जियॉरजीवा यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

क्रिस्टालिना जियॉरजीवा यांनी म्हंटले कि, दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीकडे मार्गक्रमण करत होती. परंतु, आता जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहे. २०१९ मध्ये जगातील अर्थव्यवस्थेची वृद्धी ९० टक्क्यांनी कमी होईल, असे आम्हाला वाटत आहे.

अमेरिका आणि जर्मनीमधील बेरोजगारी ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. तरीही अमेरिका, जपान आणि विशेषतः युरो क्षेत्रांतील आर्थिक घडामोडी मंदावल्या आहेत. परंतु, भारत आणि ब्राझीलसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे.

मंदीमुळे जागतिक व्यापाराची वृद्धी जवळपास थांबली आहे. भारताच्या देशांतर्गत मागणीत अपेक्षेपेक्षा कमी वाढीमुळे आयएमएफने आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या आर्थिक विकासाचा अंदाज ०.३ टक्क्यांपर्यंत खाली आणत ७ टक्के केला आहे, असे क्रिस्टालिना जियॉरजीवा यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here