ऑनलाइन शॉपिंगचा मानसिक आरोग्यावर परिणाम

एका पाहणी अहवालातून बाब समोर

पुणे – या दशकामध्ये जागतिक पातळीवर ऑनलाइन शॉपिंगचा प्रसार झाला आहे. मात्र, त्यामुळे गरज नसताना खरेदी करणे, ऐपत नसताना खरेदी करणे त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणे, तसेच ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन लागणे असे प्रकार घडू लागले आहेत. यापासून चाणाक्ष नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे या संबंधातील एका पाहणी अहवालात म्हटले आहे.

ग्राहकांच्या व्यवहाराकडे लेक्ष ठेवणाऱ्या गार्टनर या संस्थेने म्हटले आहे की, गेल्या 10 वर्षांत विकसित आणि विकसनशील देशांमध्येही ई-कॉमर्स वेगाने वाढत आहे. पुढील 5 वर्षांत यामध्ये दर वर्षाला 10 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन शॉपिंग सहज आणि सोपी असते. त्याचबरोबर ई-कॉमर्स कंपन्या टेलिव्हिजन आणि इतर माध्यमातून आकर्षक जाहिरातबाजी करतात. त्यामुळे अनेकदा अनेकजण गरज नसताना खरेदी करून टाकतात. मात्र, यामुळे या नागरिकांच्या ताळेबंदावर दबाव येतो आणि त्यातून मानसिक ताण असे प्रकार घडू शकतात.

कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून ई-कॉमर्स कंपन्या केवळ सार्वजनिक माध्यमावरच नाही तर, स्मार्टफोनच्या माध्यमातून संबंधित व्यक्‍ती कशाकडे अधिक आकर्षित होऊ शकते त्या जाहिराती टाकू शकतात. परिणामी, गरज नसताना खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्‍तीच्या कर्जात वाढ होऊ शकते. तसे झाल्यास मानसिक ताण आणि त्यामुळे इतर आरोग्यविषयक समस्या उत्पन्न होऊ शकतात, असा इशारा या संस्थेने दिला आहे. त्यामुळे स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या चाणाक्ष नागरिकांनी या व्यासपीठाचा गरजेपुरताच वापर करण्याची काळजी घेतली पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
हा प्रकार इतका वाढत आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेतली असून याबाबत ही संघटना विश्‍लेषण करीत आहे. 2024 पर्यंत जागतिक आरोग्य संघटना ऑनलाइन शॉपिंगमध्ये आणि गरजेपेक्षा जास्त रस घेणाऱ्या व्यक्‍तीला ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन लागलेली व्यक्‍ती असे संबोधू शकते. हा प्रकार तरुणांच्या बाबतीत जास्त होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)