जागतिक बाजारातील संकेताचा परिणाम; सोने आणि चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर अमेरिकन रोख्यावरील परतावा वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाले. भारतातही या घडामोडीचा परिणाम होऊन सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली.

दिल्ली सराफात सोन्याचा दर 229 रुपयांनी कमी होऊन 47,074 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 717 रुपयांनी कमी होऊन 70,807 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,832 डॉलर तर चांदीचा दर 27.38 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानिया यांनी सांगितले की, जागतिक बाजारात डॉलर वधारत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भारतात बहुतांश सोने आयात केले जात असल्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरावर होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.