नवी दिल्ली: दिल्लीतील हवेचे प्रदुषण अजून कमी होण्याचे नाव घेईना त्यामुळे याचा परिणाम दिल्लीतील पर्यटनावर झाला आहे. दिल्ली पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत चालवण्यात येणाऱ्या होप ऑन होप ऑफच्या सेवेचा वापर करणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत 10 ते 15 टक्के घटली आहे. यातच आज सकाळच्या नोंदीनुसार दिल्लीचा हवा प्रदुषण अतिधोकादायक म्हणून गणले गेले आहे.
Delhi: A layer of smog continues to cover the sky in the national capital. Visuals from the area around India Gate where the air quality remains in ‘Unhealthy’ category this morning. pic.twitter.com/emYn5UOc2g
— ANI (@ANI) November 6, 2019
तत्पूर्वी, दिल्लीतील सर्व महत्वाच्या स्थळांना सीआयएसएफच्या जवानांचे संरक्षण आहे. हजारो जवान तेथे तैनात आहेत त्यात प्रामुख्याने नॉर्थ व साऊथ ब्लॉक, लाल किल्ला, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, विविध मंत्रालये इत्यादी ठिकाणी या संस्थेचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या खराब हवेचा दुष्परिणाम या जवानांवर होऊ नये यासाठी एन 95 दर्जाचे तोंडाला बांधण्याचे मास्क जवानांना देण्यात आले आहेत.