पुणे – अपेक्षित महसूल मिळत नसल्यामुळे राज्यातील अनेक “शिवशाही’ बसेस बंद करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढवली आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागामध्येच तब्बल वीस बसेस “यार्डात’ लावण्यात आल्या आहेत. आगामी कालावधीत ही परिस्थिती अशीच राहिल्यास हा प्रकल्प आणखी अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.
याबाबत एसटी महामंडळाच्या पुणे विभागीय नियत्रंक यामिनी जोशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अपेक्षित महसूल मिळत नसल्याने काही बसेस बंद करण्यात आल्या आहेत. असे असले तरीही काही मार्गावर अपेक्षेपेक्षाही अधिक महसूल मिळत आहे.