“टिंडर’वरील ओळख पडली साडेआठ लाखांना

पुणे -“टिंडर’ या डेटिंग साइटवरून झालेल्या ओळखीतून एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून 8 लाख 66 हजार रुपये उकळणाऱ्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

नितीन सुरेंद्र भंडारी (36, रा. कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 41 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा व्यवसाय आहे. तिचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर डेटिंग साइटवर तिची भंडारीसह ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या. त्यावेळी भंडारीने महिलेला व्यावसायिक असल्याची बतावणी केली. मागील चार वर्षांपासून तो महिलेच्या संपर्कात होता. त्यानंतर व्यावसायात तोटा झाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याचे भंडारीने तिला सांगितले.

महिलेकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले. तिच्या बॅंक खात्यातून भंडारीने 8 लाख 66 हजार 400 रुपये स्वत:च्या खात्यावर वळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.