व्हॉट्‌सऍपसारख्या सेवा नियंत्रित करण्याचा विचार

नवी दिल्ली – ओव्हर द टॉप सेवा म्हणजे व्हॉट्‌सऍप, स्काईप अशा सेवा नियंत्रित करायचा की नाही यासंदर्भात सरकारचा विचार चालू आहे. दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्राय या संदर्भात विविध क्षेत्रांशी चर्चा करत आहे. याबाबतच्या शिफारशी मे अखेरपर्यंत तयार होतील असे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले.

युरोपमध्ये यासंदर्भात एक संहिता तयार करण्यात आली आहे. या संहितेचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर इतर देशांत या सेवा कशा नियंत्रित करण्यात केल्या जातात याचाही आम्ही अभ्यास करत आहोत. जागतिक पातळीवरील नियमांचा सर्वसाधारण विचार करून तशाच प्रकारची चौकट भारतात करण्याच्या शक्‍यतेवर विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही आमचे मत मे च्या अखेरपर्यंत दूरसंचार विभागाला देणार आहोत. या संबंधात बंगळूर येथे सार्वजनिक चर्चा करण्यात आली अशा प्रकारची चर्चा दिल्लीतही करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.