नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळण्यात आले होते. बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी आज त्याच ठिकाणी एन्काऊंटर केला असून, त्यांना मृत घोषित केले आहे. या प्रकरणानंतर सर्वसामान्यांकडून स्वागत होत असताना बुद्धीजीवी आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून मात्र घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.
Hyderabad MP and AIMIM Chief Asaduddin Owaisi: I am against encounters. Even, National Human Rights Commission has taken cognizance of the encounter. #Telangana pic.twitter.com/VgxV6r6WRB
— ANI (@ANI) December 6, 2019
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसी यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि मेनका गांधी यांनीही विरोधी मत व्यक्त केले आहे.
Agree in principle. We need to know more, for instance if the criminals were armed, the police may have been justified in opening fire preemptively. Until details emerge we should not rush to condemn. But extra-judicial killings are otherwise unacceptable in a society of laws. https://t.co/BOMOjCYrb1
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 6, 2019
मेनका गांधी यांनी या एन्काऊंटरला भयानक म्हटलं आहे. जे झालं ते देशासाठी अतिशय भयानक आहे, केवळ तुम्हाला तसं करायचंय, म्हणून तुम्ही लोकांचा जीव घेऊ शकत नाहीत. तुम्ही कायद्याला हातात घेऊ शकत नाहीत. त्या आरोपींना न्यायालयाकडून फाशी मिळणार होतीच. असं गांधींनी म्हंटलं आहे. संसदभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मनेका गांधींनी आपलं मत परखडपणे मांडलं.
BJP MP Maneka Gandhi on Telangana encounter: Jo bhi hua hai bohot bhayanak hua hai is desh ke liye, you cannot kill people because you want to. You cannot take law in your hands, they(accused) would have been hanged by Court anyhow pic.twitter.com/4in4sBMJDp
— ANI (@ANI) December 6, 2019