पुणे – पत्नीला ब्लू फिल्म दाखवून अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पतीला अलंकार पोलिंसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पतीविरोधात मुलीला मारहाण केल्याचेही तक्रार देण्यात आली आहे.
बिपीन ईश्वरलाल बोरा(48,रा.कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीचा विवाह 1996 साली झाला होता. यानंतर तीचा पती बिपीनने जबरदस्तीने शारीरीक व मानशिक त्रास देत शारिरीक संबंध ठेवले. शारिरीक संबंध ठेवताना सीडी प्लेअरवर ब्लू फिल्म लावली जात होती. यानंतर जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवला जात होता.
फिर्यादीचे व मुलीचे पालनपोषण करण्याची जबाबदारीही आरोपीने व्यवस्थीत संभाळली नाही. घर खर्चालाही पैसे न देता आर्थिक व मानसिक त्रास दिला. मुलीने पैसे मागितल्यावर मुलीलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गाडे करत आहेत.