Pune Crime | बोपदेव घाटात नेत पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड; पती अटकेत

पुणे – पत्नीने ती काम करत असलेली जागा न दाखवल्याने पतीने तीला बोपदेव घाटात नेत चेहऱ्यावर ऍसिड टाकले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती दिनेश शिरपत धुमक(39,रा.बावधान गाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनेश त्याच्या 37 वर्षीय पत्नीवर नेहमी संशय घेत होता. तो पेटींगचे काम करतो तर पत्नी धुण्या भांड्याची कामे करते. घटनेच्या दिवशी पती तीला तुझे काम करण्याचे ठिकाण दाखव म्हणून दुचाकीवर बसवून घेऊन जात होता. मात्र तीने कामाचे ठिकाण दाखवण्यास नकार दिला.

यामुळे त्याने दुचाकी बोपदेव घाटात नेली. तेथे तीला चेहरा बघायचा असल्याचे सांगत तोंडावरील मास्क काढायला सांगितला. यानंतर त्याच्याजवळ असलेल्या बाटलीतील ऍसिड तीच्या अंगवार व तोंडावर टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याची पत्नीच्या डाव्या डोळ्यावरी व खांद्यावर भाजले आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट करत आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.