नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्रशासानात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. कुलगुरू एम जगदेशकुमार यांचा त्यात समावेश होता. विद्यपीठाचे अधिष्ठाता आणि तीन रेक्टरचा त्यात समावेश होता.
आम्ही गेल्या महिन्यात लागू केलेली शूल्कवाढी संदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. हा मुद्दा सोडवण्यावर आम्ही काम करत आहोत. हे एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. त्याची प्रतिष्ठा तशीच जपली पाहिजे, असे मनुष्य बळ विकास सचिव अमित खरे म्हणाले. आम्ही विद्यापीठ अनुदान आयोगालाही निधी देण्याबाबत पत्र पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले.
येथील होस्टेलच्या शुल्कात केलेली वाढ मागे घेण्यासाठी गेले दोन महिने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. होस्लची बनवलेली आचारसंहिता हा विद्यार्थी आणि प्रशासनातील वादाचा मुद्दा बनला आहे.