नगर -करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता हॉटेल व्यावसायिक सरसावले असून नगर शहर व परिसरातील हॉटेल, परमिट रुम व बिअर बार गुरुवारीपासून पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत जागरुक नागरिक मंचचे सुहास मुळे यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेवून हॉटेल बंदचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आ. जगताप यांनी लगेच शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर त्यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी गर्दी टाळण्यासाठी हॉटेल बंद करणे आवश्यक असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रदिप पंजाबी, सचिव डॉ. अविनाश मोरे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर गुरुवारपासून पुढील तीन दिवस हॉटेल बंद करण्याचा निर्णय झाला. बुधवारीपासून हा निर्णय घेण्यात येणार होता.व्यावसायिकांना या निर्णयाची माहिती लगेच देणे शक्य नसल्याने गुरुवारपासून हॉटेल बंद करण्यात येणार आहेत.