हॉटेल व्यवसाय सावरतोय…; व्यावसायिकांकडून समाधान

आंबेगाव बुद्रुक – करोना काळात हॉटेल व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला. अनलॉकनंतर हा उद्योग पुन्हा सावरू पाहत आहे. करोना सुरक्षिततेची सर्व नियम पाळले जात असल्याने पुणे शहर तसेच उपगरांतील हॉटेल, रेस्टॉरन्टला खवय्ये पुणेकर ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, याबाबत हॉटेल व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, असे हॉटेल साई पॅलेसचे संचालक अनंता भूमकर यांनी सांगितले.

मुंबई बेंगलोर हायवे वरील, भूमकर नगर, काळूबाई मंदिर शेजारी, नऱ्हेगाव येथील कार्यक्रमात भूमकर बोलत होते. ते म्हणाले की, अनलॉकनंतर पुणेकर ग्राहक कसा प्रतिसाद देतील, याबाबत शंका होती. परंतु, हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. कात्रज परिसरामध्ये नवनवीन हॉटेलांच्या शाखा सुरू होत आहे.

दामोदर शेट्टी म्हणाले की, करोना नियमांचे पालन करून ग्राहकांना सेवा दिली जात असल्याने ग्राहक प्रतिसाद देत आहेत. ग्राहक, पर्यटक, व्यावसायिक आणि फॅमिलीला सर्वसोयींच्या निवासासह, उत्तम चवीचे जेवण देण्यावर भर असल्याने ग्राहकांची पावले पुन्हा हॉटेलकडे वळू लागली आहेत.

पर्यटक, व्यावसायिक, फॅमिली अशा विविध गटातील ग्राहकांकरीता हॉटेल सज्ज आहेत. ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून हा व्यावसाय पूर्वपदावर येत आहे. सर्व हॉटेलांमध्ये करोना नियमांचे पालन केले जात आहे.
– अनंता भूमकर, हॉटेल साई पॅलेस

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.