मुंबई – करोनाची लागण झालेली असून सुद्धा बेजबाबदार वर्तन करून सार्वजनिक ठिकाणी वावर केल्याबद्दल गायिका कनिका कपुर हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लखनौच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हॉस्पिटलमध्ये आपला तोरा दाखवू लागली आहे. व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट द्या अशी मागणी करत ती डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ आणि इतर अनेक शहरांतील व्हिआयपी लोकांना कनिका कपूरमुळे क्वारंटाइन व्हावं लागलं. कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ती सध्या लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पण, तेथेही आपले टॅन्ट्रम तिने कायम ठेवले आहेत .
या हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. के. धिमान यांनी सांगिलतं की, तिच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. मात्र तिच्या वागणूकीमुळे सध्या या हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ वैतागला आहे. लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SGPGI)च्या डायरेक्टरनं कनिकावर आरोप केला आहे की, ती तिच्या उपचारामध्ये हॉस्पिटल स्टाफला सहकार्य करत नाही.
डायरेक्टरचं म्हणणं आहे की, कनिकासाठी सर्व चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तिचा आयसोलेशन रूम एअर कंडिशन आहे. ज्यात टॉयलेट, पेशंट बेड आणि टीव्ही आहे. याशिवाय तिला कॅन्टिनमधून तिला ग्लूटन फ्रि जेवण दिलं जात आहे. मात्र तरीही तिचं स्टाफशी वागणं चांगलं नाही. ती हॉस्पिटलमध्ये असं वागते की, ती पेशंट नाही तर एखादी स्टार आहे. ज्यामुळे सध्या हॉस्पिटल स्टाफ वैतागला आहे.
तिच्यावर कोरोना लसीची चाचणी घ्या कारण तिच्या मुर्ख
पणा मुळे बर्याच लोकांचे जिवन टांगणीला लागले आहे.
तिला सांगा तू सेलिब्रिटी असली तरी तुला वाचवायचा आमच्या हातात आहे त्यामुळे cooperate कर नाहीतर आम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही ,1दा तंबी भेटल्यावर जाग्यावर येईन,