कण्हेरीत बिबट्याची दहशत कायम

नर बिबट्या जेरबंद झाला तेथे पुन्हा मादीच्या पायाचे ठसे आढळले

डोर्लेवाडी- बारामती तालुक्‍यातील कण्हेरी येथील संतोष जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. 30) नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता. तर मादी जातीचा बिबट्या पिंपऱ्याला गुंगारा देत पसार झाला आहे. तर शुक्रवारी (दि. 31) जाधव यांच्या शेतात पुन्हा बबट्याचे ठसे आढळून आले असल्याने परिसरात मादी बिबट्याची दहशत कायम आहे.

कण्हेरी भागात गुरुवारी (दि.30) नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. यामुळे कण्हेरी-काटेवाडी परिसरात थोडी फार प्रमाणात भीती कमी झाली असली तरी मादी जातीचा बिबट्या अजूनही जेरबंद न झाल्याने भीती कायम आहे. कण्हेरी भागातील शेतकरी संतोष जाधव हे उसाच्या शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना उसामध्ये प्राण्याचे ठसे आढळून आल्याने त्यांनी याबाबत वनविभागास कळवले. वनविभागाने संबंधित ठिकाणी येत पाहणी केली असता हे ठसे बिबट्याचेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मादी जातीचा बिबट्या अजूनही याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी विभागात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला मात्र त्याच्याबरोबर असलेली मादी पसरा झाली होती. दरम्याम, बिबट्या जेरबंद होताना त्या मादीने प्रत्यक्षात पाहिले असल्याने ती पिसाळलेली आहे, त्यामुळे किमान पुढचे चार दिवस त्याचठिकाणी पिंजरा लावणे शक्‍य होणार नाही. चार दिवसानंतर ही मादी शांत झाल्यावर पिंजरा लावला जाईल, असे पुण्यातील रेस्क्‍यू पथकाने सांगितले.

  • आज आढळून आलेले ठसे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी दोन कॅमेरे लावण्यात आले असून आवश्‍यकता वाटल्यास अजून दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील; मात्र पिंजरा चार दिवस लावता येणार नाही. दरम्यान, मादी जरी पिसाळली असली तरी गुरुवारी आणि शुक्रवारी कुठेही पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याचे आढळून आले नाही.
    – त्र्यंबक जराड , वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.