नवी दिल्ली – आशियाई हॉकी महासंघाकडून येत्या 19 जुलैला हॉकी इंडियाच्या प्रशिक्षक तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ऑनलाइन वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडल्या तसेच काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने प्रशिक्षक व तांत्रिक अधिकाऱ्यांना नियमांची माहिती व्हावी तसेच करोनानंतर जेव्हा स्पर्धा सुरू होतील त्यावेळी कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, याबाबत सर्व माहिती या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्यानंतर हे वर्कशॉप आयोजित केले जाणार होते. मात्र, त्यावेळी काही नियमांमध्ये महासंघाला बदल करणे गरजेचे वाटल्याने हे वर्कशॉप 19 जुलै रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.