बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आत्ता सर्कस देणारा पक्ष – रोहित पवार 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप-शिवसेना युतीवर सडकून टीका केली आहे. युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आत्ता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल, अशा शब्दात रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसेनेनवर निशाणा साधला आहे.

काय आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट 
कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे, ते शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता.

पण आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठ्ठा भाऊ मानलं. काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली. पाच वर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणत मगरीचे अश्रू ढाळले आणि आत्ता मुद्दे सोडून व्यक्तिगत टिका करु लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच सख्य आठवलं की काळीज, कोथळा, वाघनखे हे शब्द आजही आठवतात.

युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आत्ता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.