तुळापूर: आज छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या तुळापूर येथील समाधीपुढे हजारो शंभूप्रेमी नतमस्तक होण्यासाठी आले होते. या वेळी स्वराज्य-रक्षक संभाजी मालिके मध्ये, शंभू महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित होते.
हे राजकीय व्यासपीठ नसून, मी राजकीय बोलणार नाही. एक सच्चा शंभू भक्त म्हणून मातीला नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. असं अमोल कोल्हे यांनी त्यांच्या छोट्याश्या भाषणात सांगितलं. शंभूराजेंचा इतिहास हा संपूर्ण देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. असा शब्द देतो, अस अमोल कोल्हे म्हटले.