पुसेसावळी, (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहवी, हुतात्म्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर सतत राहिला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.
हुतात्म्यांचा इतिहास नवीन पिढीसाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे, असे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
वडगाव (जयरामस्वामींचे ता. खटाव) येथे हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर,
नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, जितेंद्र पवार, मानसिंग जगदाळे, भाग्यश्री भाग्यवंत, शिवाजी सर्वगोड, प्रा. बंडा गोडसे, संदीप मांडवे, मानसिंग माळवे, सी. एम. पाटील, संतोष घार्गे, चंद्रकांत पाटील, सुरेशबापु पाटील, सुहास पिसाळ, संभाजी थोरात, कृष्णत पिसाळ उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. हुतात्मा भूमीच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हुतात्म्यांचा त्याग व देशनिष्ठा कायम स्मरणात ठेवली पाहिजे, हुतात्म्यांमुळे आपणास स्वातंत्र्य मिळाले असून त्यांच्या पवित्र स्मृती जतन करुन भावी पिढीसाठी आदर्श निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, से आवाहन प्रभाकर घार्गे यांनी केले.
यावेळी अनिल देसाई, उज्वला गाडेकर, प्रा. बंडा गोडसे, किरण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. हुतात्मा वारस, तसेच एमपीएससीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल किरण घार्गे व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी सरपंच सुशीला पिसे, उपसरपंच राजेंद्र घार्गे, हणमंत भोसले, दत्तात्रय रुद्रुके, अविनाश घार्गे, पिंटु घार्गे, ग्रामविकास अधिकारी आर. एन. जगताप, पोलीस पाटील किशोर नागमल, शासकीय अधिकारी यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सुहास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संतोष घार्गे यांनी आभार मानले.