ऐतिहासीक ‘हिरकणी’ चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहिलंत का?

मुंबई  मराठी अभिनेता ‘प्रसाद ओक’ सिनेरसिकांसाठी लवकर एक सुंदर विषयावर चित्रपट घेऊन येणार आहे. ‘हिरकणी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच प्रसादने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हिरकणी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

“आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा ” असं टॅगलाइनखाली देण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबरला संपूर्ण महारष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

शिवाजी महाराजांच्या रायगडाचे गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या घरी असलेल्या बळासाठी हिरकणी गडाच्या एका बुरूजावरून खाली उतरली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव ठेवले. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मुलासाठी हिरकणी उचलेले हे पाऊल पुन्हा एकदा आई आईच असते हे सिध्द केलं होतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.