राज्यात ‘सोमेश्‍वर’चा उच्चांकी दर

कारखान्याचे अध्यक्ष जगताप यांची माहिती


सप्टेंबर महिन्यात 100 रुपयांचा दुसरा हप्ता वर्ग करणार

सोमेश्‍वरनगर – श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम 2018-19 करिता प्रति मे.टन 3300 रुपये अंतिम ऊस दर देणार आहे. यातील 100 रुपयांचा दुसरा हप्ता सप्टेंबरमध्ये सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

सोमेश्‍वर कारखान्याच्या 2018-19 हंगामाची 2 हजार 774 रुपये प्रति मे.टन एफ. आर.पी असून आज अखेर कारखान्याने 2 हजार 824 रुपये सभासदांना अदा केले असून उर्वरित 476 पैकी दुसरा 100 रुपयांचा हप्ता सप्टेंबरमध्ये सभासदांना अदा करणार आहेत. प्रति मे. टन 3 हजार 300 रुपये ऊसभाव जाहीर करणारा सोमेश्‍वर हा राज्यातील पहिलाच कारखाना आहे. कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे व कारखान्याचे सभासद, अधिकारी-कामगार ऊसतोडणी वाहतूकदार-कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्‍वरचे घौडदौड यशस्वीरित्या सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्यामुळेच शुगर प्लॅंट, को जनरेशन व डिस्लरी हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चांगल्या पद्धतीने चालल्यामुळे त्यामधून आपल्याला दर्जेदार उत्पादन घेतले व त्या मधल्या नफ्यातूनच आपण सर्वोच्च दराचा निर्णय घेतला असल्याचे जगताप यांनी नमूद केले.

जिल्ह्यात क्रमांक एकचा साखर उतार
श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे 2018-19 च्या गाळप हंगामात कारखान्याने येथून 10 लाख 04 हजार 388 मे.टन उसाचे गाळप करीत जिल्ह्यात क्रमांक एकचा 12.18 टक्‍के साखर उतार राखीत 12 लाख 24 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा 2018-19 चा हंगाम सर्वच बाबतीत आज अखेर ऐतिहासिक गाळप हंगाम पासून ऊस दरातही कारखाना सर्वोच्च स्थानावर आहे. 3300 रुपये प्रति मे.टन ऊस दर जाहीर करत असताना येणाऱ्या हंगामातही संचालक मंडळ ऊस दरात व कारखान्याच्या सर्वच बाबतीत सर्वोच्च स्थानी राहण्याचा प्रयत्न करेल, असा विश्‍वास पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्‍त केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×