जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस टेमघर धरणामध्ये

पुणे – जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी सर्वाधिक पाऊस हा टेमघर (ता. मुळशी) धरणात झाला आहे. याठिकाणी 1 जून ते आजपर्यंत 4 हजार 63 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वडीवळे धरण परिसरात 3 हजार 658 मिमी तर मुळशी धरणात 3 हजार 578 मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे.

यंदा जिल्ह्यात चांगल्या स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होऊन बहुतेक धरणे भरली. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले. यामुळे नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या.

पवना धरणात 3 हजार 119 मिमी, निरा देवधरमध्ये 3 हजार 21 मिमी, पानशेत धरणामध्ये 2 हजार 879 मिमी, वरसगावमध्ये 2 हजार 869 मिमी, गुंजवणी धरणात 2 हजार 457 मिमी, कळमोडी धरणात 1 हजार 632 मिमी, माणिकडोहमध्ये 1 हजार 51 मिमी, डिंभे धरणात 1 हजार 374 मिमी, भामा आसखेड धरणात 1 हजार 335 मिमी.

Leave A Reply

Your email address will not be published.