शिवाजीनगर, धनकवडीत सर्वाधिक पाऊस

– सुनील राऊत

पुणे : शहरात धनकवडी, सिंहगड रस्ता तसेच शिवाजीनगर परिसरात गेल्या 24 तासात तब्बल 100 मिमी पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर नगररस्ता, हडपसर परिसरातही मोठा पाऊस झाला असून या पावसामुळे शहरात जवळपास 24 ठिकाणी रस्त्यावर तसेच सखल भागात पाणी सचल्याच्या घटना घडल्या असून अनेक रस्त्यावर पाण्याची तळी साचल्याने शहरातील वाहतुकीचा वेग सकाळ पासून मंदावलेला आहे.

जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस
कर्वेनगर – 53.50
कात्रज – 51.50
घोले रस्ता – 104.00
पीएमसी बिल्डिंग – 50.00
हडपसर/मुंढवा – 61.00
कसबा/विश्रामबाग वाडा – 76.00
औंध – 79.50
येरवडा/ संगमवाडी – 30.50
कोंढवा/येवलेवाडी – 72.00
नगर रस्ता/ वडगाव शेरी – 53.50
भवानी पेठ – 52.00
कोथरूड – 62.50
सहकार नगर/ धनकवडी – 102.00
ढोले-पाटील – 12.50

Leave A Reply

Your email address will not be published.