पुणे : करोना बाधितांचा उच्चांक

पुणे – गेल्या 24 तासांत करोना बाधितांचा उच्चांक झाला असून, 661 बाधितांची नोंद दिवसभरात करण्यात आली. बाधितांची संख्या अधिकच वाढत असून, नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

बाधितांची संख्या वाढतच असून, अनेकांना तीव्र लक्षणे दिसत असून, ऍक्टिव्ह रुग्णसंख्याही वाढत आहे. मंगळवारची ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 3201 आहे. त्यातील 201 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर एकूण बाधितांची आकडेवारी आता 1 लाख 98 हजर 953 झाली आहे. त्यातील 1 लाख 90 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत.

 

मंगळवारी 358 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  गेल्या चोवीस तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, तीन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात एकूण 4,834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 4,606 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली आहे.

 

 

रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची भीती

शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस 28 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गर्दी जमवून सार्वजनिक कार्यक्रम घेणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असून, मास्क न वापरणाऱ्यांविरूद्धही कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 

असे असतानाही रस्त्यांवरील तसेच बाजार पेठेतील गर्दी कमी होताना दिसत नाही. पर्यायाने रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, अशीच परिस्थिती राहिल्यास रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.