एकात्मिक आदिवासी प्रकल्पात सव्वातीन कोटींचा अपहार

नगर  – अकोले तालुक्‍यातील राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पाच योजनेत एकूण 3 कोटी 32 लाख 30 हजार 980 अपहार झाल्याजे उघडकीस आले आहे. याबाबत राजुर पोलीस ठाण्यात सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोहिदास कोंडीबा साबळे यांच्या फिर्याद वरून वेगवेगळ्या पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंदकांत डी भारमल यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी, व्यवस्थापकीय संचालक डीएसएच कंस्ट्रक्‍शन कंपनी व त्याचे कथीत मार्केंटींग संचालक राजेश विठ्ठलराव बाविस्कर, अब्दुल इसाक आत्तार, मनोहर दत्तात्रय तळेकर, तानाजी बी पावडे याच्यासह 9 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी लाभार्थ्यांना म्हशीचे युनिट खरेदी व पुरवठा करणे या योजनेत बनावट कागदपत्र तयार करून 1 कोटी 24 लाखाची शासनाची फसवणूक करण्यात आली.

कन्यादान योजनेत सोन्याचे मंगळसूत्र व संसारपयोगी भांडे वाटप योजनेत 50 लाखाची विल्हेवाट लावून अपहार करण्यात आला. एचडीईपी पाईप पुरवठा करण्यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने काढलेल्या बिलाची 12 लाख 36 हजार 490 रूपयांची विल्हेवाट लावून अपहार करण्यात आला. पीव्हीसी पाईप वाटप योजनेत 99 लाख 14 हजार 490 रूपयांचा अपहार, आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे युनिट खरेदी व वाटप योजनेत 46 लाख 80 रूपयांचा अपहार करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.