जुन्नर (पुणे) – जुन्नर तालुक्यात बुधवारी (दि. 2) नव्याने 33 करोना बाधितांची भर पडली आहे. मागील 24 तासांत आळे व पिंपळवंडीतील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील करोना रुग्णांचा आकडा 1236वर पोहाचला आहे. यामध्ये नारायणगावात सर्वाधिक 20 रुग्ण आढळले आहेत. ओतूर येथे 4, जुन्नर, पिंपळगाव आर्वी, वारुळवाडी, उंब्रज नं. 1, गुंजाळवाडी आर्वी, येणेरे या गावांमध्ये प्रत्येकी दोन तर, येडगाव, काळवाडी, आळे, चाळकवाडी, हिवरे बद्रुक, धालेवाडी, पिंपरी पेंढार, हिवरे तर्फे नारायणगाव या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.