नवी दिल्ली – दिल्लीत गुरुवारी करोनाबाधितांच्या संख्येत एकाच दिवसातील उच्चांकी वाढ नोंदली गेली. त्यामुळे दिल्लीत आढळलेल्या बाधितांनी 8 हजारांचा आकडा ओलांडला आहे.
दिल्लीत नव्याने तब्बल 472 करोनाबाधितांची भर पडली. याआधी तिथे 7 मे यादिवशी 448 बाधित आढळले होते. ती संख्या दिल्लीतील एकाच दिवसातील सर्वोच्च ठरली होती. दिल्लीत करोनाने आतापर्यंत 115 रुग्णांचा बळी घेतला आहे.
दिल्लीत आतापर्यंत 3 हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, 17 मेनंतर लॉकडाऊन वाढला तरी त्यामध्ये बरीच शिथिलता येण्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या आधारे दिल्लीत विविध आर्थिक व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.