उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ

लखनौ : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात तुलनेने कमी रुग्णसंख्या असलेली राज्य आता कोरोनाच्या रडारवर येत असल्याचं पाहायला मिळतंय. 

सुरुवातील कोरोना रुग्ण संख्या कमी असलेल्या उत्तर प्रदेशात आज एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज ४५८६ नव्या रुग्णांची भर पडली असून यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १,०८,९७६ वर पोहचला आहे.

यापैकी ६३,४०२ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले असून ४३,६५४ रुग्ण उपचार घेत आहेत. आजच्या आकडेवारीनुसार ६४ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला असून यामुळे मृतांची एकूण संख्या १९,१८ इतकी झाली आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २७ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी दिली असून ६३,४०२ कोरोना मदत केंद्रांच्या माध्यमातून तीन लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.