नवी दिल्ली – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांना 2019 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
Happy to announce #Dadasaheb Phalke award for 2019 to one of the greatest actors in history of Indian cinema Rajnikant ji
His contribution as actor, producer and screenwriter has been iconic
I thank Jury @ashabhosle @SubhashGhai1 @Mohanlal@Shankar_Live #BiswajeetChatterjee pic.twitter.com/b17qv6D6BP
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 1, 2021
“भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादा साहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.’ या आशयाचे ट्विट जावडेकर यांनी केलं आहे.
सिनेसृष्टीतल महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. सुपरस्टार रजनीकांतचे भारतातच नव्हे तर जगभरात लाखोंच्या संख्येने चाहते आहेत.