देशात करोनाच्या रूग्ण वाढीचा आजवरचा उच्चांक

नवी दिल्ली  – देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 3 हजार 558 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात इतक्‍या मोठ्या प्रमाणात करोना रूग्ण आढळून येण्याचा देशातला हा एक उच्चांक आहे. आधीच्या लाटेतही एका दिवसात इतक्‍या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले नव्हते.

काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली करोनाची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीनंतर जे निवेदन सरकारकडून प्रसिद्धीला देण्यात आले होते त्यात लोकांकडून करोनाच्या संबंधातील नियमांमध्ये जी ढिलाई दाखवली गेली आहे तीच करोना प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली आहे असे नमूद करण्यात आले होते. एका दिवसात सर्वाधिक रूग्ण आढळून येण्याचा प्रकार या आधी 17 सप्टेंबर 2020 दिसून आला होता. त्यादिवशी एकूण 97 हजार 894 करोना रूग्ण आढळून आले होते. एका दिवसात एक लाखापेक्षा अधिक रूग्ण आढळून येण्याचा प्रकार देशात आज पहिल्यांदाच नोंदवला गेल्याने गेल्याने सरकारी यंत्रणा हादरून गेल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.