‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी फेटाळली 

नवी दिल्ली – वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. यासोबतच राष्ट्रगीताच्या रूपात वंदे मातरमचा प्रचार-प्रसार करण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली.

वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी करणारी एक याचिका भाजप अध्यक्ष अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हंटले कि, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरमचे विशेष महत्व आहे. मात्र, दुर्देवाने देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘जण गण मन’ गीताला पूर्ण सन्मान देण्यात आला. परंतु, वंदे मातरम विस्मरणात गेले. यासाठी वंदे मातरमला राष्ट्रगीत घोषित केले जावे. व हे गीत गाण्यासाठी नियम बनवले जावे. तसेच लहान वयातच देशभक्तीची भावना मनात रुजवण्यासाठी दररोज  शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य करावे, अशी मागणी अश्विनी उपाध्या केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.