सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही -पंकजा मुंडे

बीड : भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्याचं झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटीची मदत पुरेशी नाही. त्यामुळे सरकारने आणखी मदत करावी,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सावरगावातील मेळाव्यात केली.

दसऱ्यानिमित्त सावरगावातील भगवान गडावर मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली असून, आज पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. “विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केले. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई. एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत,” अशी खंत पंकजा यांनी व्यक्त केली.

“खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे घरी बसल्या आहेत. गोपीनाथ मुंडे गेले आहेत. अपप्रचार सुरू होता. पण, करोना काय मी आणला का? करोनात जबाबदारीनं वागले. साहेबांच्या जयंतीला परवानगी मागितली, तेव्हा मला विनंती केली. पण, भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय राहू शकत नाही. जिवंत असेपर्यंत भगवान गडावर येत राहिन,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला आहे. मी सरकारकडे मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मदत जाहीर केली. सरकारनं १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण, ती पुरेशी नाही. शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे. त्यामुळे सरकारनं आणखी मदत जाहीर करावी,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.