पुढच्या वर्षी उष्णतेची लाट 18 दिवस राहणार

नवी दिल्ली – पुढच्या वर्षी देशभरात उष्णतेची लाट तब्बल 18 दिवस जाणवणार आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे 2064 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा दाह कायम राहणार आहे. नाइन क्‍लायमेट या मॉडेलवरून तापमानवाढीबाबत हवामानतज्ञांनी हा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रचंड पारा वाढला आहे. महाराष्ट्रातही नागपूर, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला पाहण्यास मिळाला. उष्मा वाढल्याने लोकांना उकाड्याचा प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला होता.

विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह राज्यभरात कडक उन्हाळा होता यात काहीही शंका नाही. त्याचप्रमाणे देशातही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले. देशभरात सर्वाधिक तापमान हे राजस्थानातल्या श्री गंगानगर या ठिकाणी नोंदवले गेले. उन्हाचा पारा 49.6 अंशांवर नोंदवला गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.