खेळाडूंचे अरोग्य सर्वात महत्त्वाचे….

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – जगभर पसरलेल्या करोना विषाणूंविरोधात उपयुक्‍त ठरेल अशी लस वा औषध तयार झाल्यानंतरच जागतिक स्तरावर हॉकी स्पर्धांना प्रारंभ होईल, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने दिले आहे.

क्रिकेटसह विविध खेळांबाबत भारतासह काही देशांनी जरी अनुकुलता दर्शवली असली तरीही जोवर करोनावर रामबाण उपाय हाती लागत नाही तोपर्यंत स्पर्धांच्या तसेच सरावाच्या आयोजनाचा विचारही करण्यात अर्थ नाही. खेळापेक्षा खेळाडूंचे आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे. त्यांनाच केंद्र स्थानी ठेवून महासंघ पुढील काळात सराव सत्रांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करेल, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे.

नेदरलॅंड व बेल्जियम या देशांमध्ये मुळातच करोनाचा फारसा धोका नव्हता त्यामुळे तिथे सराव शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. पण म्हणून सर्व देशांमध्ये शिबिरे सुरू होऊ शकत नाहीत. युरोप, अमेरिका यांसह विविध ठिकाणी हा धोका सर्वाधिक होता. तिथेही परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आगामी काळात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही महासंघाने व्यक्‍त केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.