आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याला “मनसे’ घेराव

आठवड्यात कचराप्रश्‍न न सुटल्यास खुर्चीवर बसू न देण्याचा इशारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहरात रोगराई पसरेल असे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही बाब गांभिर्याने घेत, तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्षमण गोफणे यांना घेराव घालत, आठ दिवसांत परिस्थितीत सुधारा, अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील कचरा उचलण्याचे नव्याने सुरु झालेले काम पूर्ण क्षमतेने होत नसल्याने कचरा एकाच जागी साचून राहत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. संततधार पावसामुळे यामध्ये आणखी भर पडत आहे. शहरातील नागरिक नियमितपणे सर्व कर भरत असतानादेखील त्यांना मुलभूत सुविधादेखील महापालिका पुरवू शकत नाही.

या प्रकाराला ठेकेदार, अधिकारी व सत्ताधारी भाजप जबाबदार आहे, असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसांत शहरातील कचरा समस्या न सोडविल्यास महापालिकेतील अधिकाऱ्यांना खुर्च्यावर बसू न देण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. मनसे गटनेते सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, महिला सेना अध्यक्षा अश्‍विनी बांगर, रुपेश पटेकर, सुरेश सकट, मयूर चिंचवडे, चंद्रकांत दानवले, अनिल भुजबळ, राजू सावळे, अनिता पांचाळ, दक्षता क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)