सविंदणे (प्रतिनिधी) : मलठण ता. शिरूर येथिल असणाऱ्या शिंदेवाडीमधील बापू ताऊजी शिंदे ( वय वर्ष -३७ ) या युवकाचा ऊरळगायेथिल व ता. शिरूर येथिल वनविभागाच्या जमिनीलगत असणाऱ्या भिमानदीपात्रात शिर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच शिरूर तालुक्यात खळबळ माजली आहे. तो बेपत्ता असल्याची तक्रार शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औट पोस्ट येथे दि. ०३ रोजी करण्यात आली होती.
भिमानदीपात्रामध्ये अतिशय सडलेल्या अवस्थेत हात, पाय व धडाचा भाग असलेला व शीर नसलेला मृतदेह तरंगताना दि. ८ रोजी आढळून आला होता. शिंदेवाडी ते उरळगाव हे अंतर साधारणतः पन्नास किलोमीटर लांब आहे. एवढया लांब नेऊन निर्जन ठिकाणी हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काही महिन्यापुर्वी याच शिंदेवाडीतील एका युवकाचे अपहरण करून भिमाशंकर परिसरात हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुदैवाने पळून जाण्यात यशस्वी झाल्याने तो वाचला. युवकाची हत्या केलेल्या आरोपींना तात्काळ गजाआड करण्याची मागणी शिंदेवाडीकरांनी केली आहे.
ही हत्या नेमकी कुणी व कशासाठी केली आहे हे अद्यापपर्यत समजू शकले नाही.टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे, न्हावरा औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल मोटे हे अधिक तपास करत आहे.