कोरोनाचा कहर ; राज्यात सर्वाधिक तब्बल 2940 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या तब्बल 2940 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44,582 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 30,474 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल  राज्यात सर्वाधिक 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी 27 जण मुंबई, पुण्यातील 9, जळगाव 8, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद शहरात 3, साताऱ्यात 2, मालेगाव 1, कल्याण डोंबिवली 1, उल्हासनगर 1, पनवेल 1 तर नागपूर शहारात एकाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1517 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 857 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 32 हजार 777 नमुन्यांपैकी 2 लाख 88 हजार 195 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 44,582 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 69 हजार 275 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 28 हजार 430 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 12,583 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.