मुंबई – हॅंडबॉल प्रीमियर लीगचे (पीएचएल) आयोजन पुढील वर्षी मार्चमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती या खेळाचा प्रसार व नियोजन करत असलेल्या ब्ल्यू स्पोर्टस एंटरटेनमेंट कंपनीने दिली आहे.
देशात हॅंडबॉलचा प्रसार करण्यासाठी ही कंपनी येत्या काळात तब्बल अडीचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
भारतामध्ये पुढील पाच वर्षांत हॅंडबॉलचा वेगाने प्रसार व्हावा यासाठी ही गुंतवणूक होणार आहे. ब्ल्यूस्पोर्टने हॅंडबॉल लीगच्या आयोजनाचे हक्क मिळवले आहेत.
पुरुष आणि महिला गटासाठी प्रत्येकी 120 कोटी रुपयांची गुंतवणूक करतानाच तळागाळात हॅंडबॉल खेळला जावा यासाठी 35 कोटी रुपये गुंतवले
जाणार आहेत.