संरक्षक भिंतीचे कवच डुडुळगावमधील जागेला

पाईपलाईन टाकण्यासाठी मावळातील जमीन वळती

मावळ तालुक्‍यातील कोंडिवडे गावातील राजीव राऊत यांच्या जागेत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी या ठिकाणी असलेली वन विभागाची जमीन वळती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सर्व्हे क्र. 46 मधील 0.01 हेक्‍टर जमीन अटी, शर्तीच्या अधीन राहून राखीव वनासाठी असलेली ही जमीन वळती करण्यास अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी मान्यता दिली आहे.

पिंपरी – डुडुळगाव येथील वन विभागाच्या मालकीच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता 41 लाख, 84 हजार, 700 रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व्हे क्र. 11 मध्ये ही जागा आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण आठ ठिकाणच्या जमिनीला अशा प्रकारची भिंत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण 3 कोटी, 24 लाख, 56 हजार, 200 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे होणारे अतिक्रमण वन विभागाला थोपविता येणे शक्‍य होणार आहे.
वन विभागाच्या वतीने आपल्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जमिनींचा आढावा घेण्यात आला. त्याकरिता याठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर एकूण आठ जागांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

या सर्व जमिनींना संरक्षक भिंत उभारताना मालकी हक्काची पूर्तता करुन घ्या, तसेच सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना काम सुरू करण्यापूर्वी संरक्षक भिंतीचे संकल्पन तयार करुन, त्यास प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊनच निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम करत असताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करण्याची देखील सूचना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.