रुग्णांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर
बारामती( प्रतिनिधी) : बारामतीत कोरोना संक्रमित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
बारामती शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असून आज १६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीत एकूण रुग्णांची संख्या१९२ वर पोहोचली आहे.
दि (४) नव्याने 96 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी दिवसभरात सोळा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सकाळच्या वेळी 13 जन कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रतिक्षित असलेले अहवाल दुपारी हाती आल्यानंतर आणखी तीन नवे रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नव्याने निष्पन्न झालेले रुग्णांमध्ये शहरातील सुहास नगरमधील एका महिलेचा समावेश आहे. अमराई मधील एक युवक व श्रीराम गल्लीतील पुरुष असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत .