नगर- नगर जिल्ह्यात उपचार घेणारी करोनाबाधित रुग्णसंख्या आता तब्बल चार हजारांच्या पुढे गेली आहे. आजही तब्बल 599 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे उपचार घेणार्यांची संख्या आता 4 हजार 121 झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
आज दिवसभरात 456 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 81 हजार 436 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.88 टक्के इतके झाले असून, ते आणखी घटल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 51, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 390 आणि अँटीजेन चाचणीत 158 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, नगर ग्रामीण 01, पाथर्डी 03, श्रीरामपूर 16 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 128, अकोले 04, जामखेड 05, कर्जत 05, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 10, नेवासा 17, पारनेर 09, पाथर्डी 06, राहाता 53, राहुरी 16, संगमनेर 28, शेवगाव 11, श्रीरामपूर 61, कॅन्टोन्मेंट 03 इतर जिल्हा 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 158 जण बाधित आढळुन आले. मनपा 27,अकोले 02, कर्जत 15, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 10, नेवासा 05, पारनेर 04, पाथर्डी 25, राहाता 19, राहुरी 17, संगमनेर 01, शेवगाव 18, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 06, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 124, अकोले 05, जामखेड 06, कर्जत 11, कोपर गाव 74, नगर ग्रामीण 19, नेवासा 17, पारनेर 25, पाथर्डी 12, राहाता 49, राहुरी 15, संगमनेर 15, शेवगाव 13, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट 01 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपड्ेट्स –
बरे झालेली रुग्ण संख्या : 81436
उपचार सुरू असलेले रूग्ण : 4121
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 1189
एकूण रूग्ण संख्या : 86746