ताथवडेत किराणाचे दुकान खाक

सुमारे 35 लाखांचे नुकसान : शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

थेरगाव  – डांगे चौक ताथवडे रस्त्यावरील किराणा मालाच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, फर्निचरसह किराणा मालाचे सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

डांगे चौक-ताथवडे रस्त्यावरील सोनिगरा पार्कमध्ये गणेश सुपर मार्केट नावाचे हे किराणा मालाचे दुकान आहे. दुकान मालक दिपाराम गुलबाजी राठोड (वय-50, रा. ताथवडे) हे रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले.

मंगळवारी (दि. 26) मध्यरात्री दीडच्यानंतर दुकानाला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला प्रत्यक्षदर्शींनी दिल्याने रहाटणी अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला दलाच्या जवानांनी एक तासात आग आटोक्‍यात आणली. या आगीत डीप फ्रिज, कुलर, कॉस्मेटिक्‍स, डेअरी प्रॉडक्‍ट्‌स, संपूर्ण किराणा माल याच्यासह फर्निचर जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.