माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांचे प्रतिपादन
वाघोली (प्रतिनिधी) : विकासकामांचा आलेख नेहमी उंचावणारा असावा त्यातून लोकाभिमुख निर्णयाची व परिसर विकासाची नवी चाहूल उदयास येत असल्याचे प्रतिपादन माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
वाघोली येथील वार्ड क्रमांक २ मधील रोज गार्डन सोसायटी अंतर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन व रस्ता काँक्रीटी करण (१ कोटी १० लाख रु) कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळेस सातव बोलत होते. वार्ड क्रमांक दोन मधील विकास कामांचे भूमिपूजन वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांच्या शुभहस्ते व वाघोली गावच्या सरपंच वसुंधराताई शिवदास उबाळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे,माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चनाताई शांताराम कटके, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच कैलास सातव, वाघोली ग्रामपंचायत
सदस्य सुधीर भाडळे, महेंद्र भाडळे, जयप्रकाश सातव पाटील,ग्रामपंचायत सदस्या वंदना दाभाडे,
माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब सातव, रोझ गार्डन सोसायटी मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.