भोरमधील ग्रामपंचायतींना मिळणार स्टीलच्या शववाहक तिरड्या

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी केले आयोजन

भोर – ग्रामीण भागात मृत्यू झाल्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली कळकाच्या बांबूची तोड केली जाते. यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. याला कायमस्वरुपी आळा घालण्यासाठी टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठान व टेक्‍नोफोर इलेक्‍ट्रॉनिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्‍यातील ग्रामपंचायती व वाड्या-वस्त्यांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या 203 स्टीलच्या शववाहक तिरड्या व शिकाळे मोफत देण्यात येणार आहेत.

जागतिक स्तरावरील हा पहिला उपक्रम असल्यामुळे भविष्यात हा उपक्रम भोरपटर्न म्हणून नावारुपाला येईल, असा विश्‍वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी व्यक्त केला.

तालुक्‍यातील203 गावांना या स्टिलच्या तिरड्या तसेच शिकाळे मोफत देण्यात येणार आहेत. स्टिलमधील तिरड्यांमुळे कळक, कडबा याची टंचाई भासणार नाही. तसेच ओढे-नाले, नदीपात्रात होणारे प्रदूषण थांबणार आहे. तिरड्या व शिकाळे बनविण्याचे काम टिटेघर येथील वर्कशॉपमध्ये सुरू आहे. पहिल्या टप्यात 30 शववाहक तिरड्या व शिकाळे वाटप होणार आहेत. या वर्कशॉपला भोरचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, टेकनोफोर इलेक्‍ट्रॉनिकचे मॅनेजर राघवेंद्र जोशी, जगन्नाथ चव्हाण, संतोष ढवळे, सुदाम ओंबळे यांनी भेट देवून राजीव केळकर यांनी भेट देऊन कौतुक केले. तसेच या उपक्रमामुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होणार असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.