आरक्षणासंदर्भात काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ घेणार राज्यपालांची भेट

मुंबई: मराठा, मुस्लीम, धनगर, महादेव कोळी आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ आज दुपारी राजभवन येथे माननीय राज्यपालांची भेट घेणार आहेत.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला असून अनेक समाजांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आमदार आरक्षणासंदर्भात राज्यपालांची भेट घेणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज विधिमंडळात काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या बैठकीला विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)