कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांची दुपारपर्यंतची डेडलाईन

बंगळुरू : कर्नाटकातील सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राज्यपालांनी आज दुपारपर्यंतची डेडलाईन दिली आहे. कर्नाटक विधानसभेत गुरूवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी आघाडी सरकारची धडपड पहायला मिळाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विश्‍वासदर्शक ठरावाशिवाय सभागृहाचे कामकाज स्थगित केले. याच्याविरोधात भाजपच्या आमदारांनी सभागृहात धरणे आंदोलन करत रात्र विधानसभेतच घालवली. दरम्यान, आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा अशा स्पष्ट सूचना कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना पत्र लिहून दिल्या आहेत.

कुमारस्वामी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने गुरूवारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात सभागृहाचा वेळ वाया घातला.तर कामकाज सुरू होण्यापुर्वीच विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही वक्‍त्यास बोलण्यास वेळेचे बंधन दिले नव्हते त्यामुळे चर्चा लांबत गेली. दरम्यान, कालच्या विश्‍वासदर्शक ठरावावेळी सभागृहात बंडखोर 16 आमदारांसह 19 आमदार गैरहजर होते. त्यामुळे आज दुपारपर्यंत कर्नाटकात आणखी राजकिय नाट्य पहायला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.