नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी आज मोठी घोषणा केली आहे. सरकारने जम्मू-काश्मीरला 80 हजार कोटीं रुपये देण्याची घोषणा केल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.
दिल्लीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत जम्मू-काश्मीरला 80 हजार कोटीं रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत अटल जल मिशन योजनेलाही मंजुरी देण्यात आली.
या योजनेसाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अटल टनल योजनेला 4 हजार कोटी मंजूर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कश्मीर मधील रॅलीला संबोधित करताना 80 हजार कोटीं रुपये देण्याची घोषणा केलीं होती.