… ‘या’ सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील – पंकजा मुंडे

मुंबई – उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेनंतर भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

गृह मंत्री यांचा राजीनामा’ देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल.. असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.