सरकार शेतमाल निर्यातीला चालना देणार

नवी दिल्ली – शेतमालीची निर्यात वाढल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सरकारने निर्यातीला चालणा देणारे धोरण जाहीर केले आहे. उच्च किमतीच्या व मूल्यवर्धित शेतमाल व टिकावू मालावर लक्ष केंद्रीत करून निर्यात वाढविण्‌यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नाविन्यपूर्ण, स्वदेशी, सेंद्रीय, एथनिक, पारंपारिक व अपारंपारिक कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यता येणार आहे. बाजारपेठेत स्थान प्राप्त करण्यासाठी, अडथळे ओलांडण्यासाठी तसेच आरोग्यपूर्ण व वनस्पतीजन्य मालासंदर्भात संस्थात्मक यंत्रणा विकसीत करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर भारतातील कृषी उत्पादनांचा टक्का वाढावा म्हणून जागतिक मुल्य साखळीत सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

देशाबाहेरील बाजारपेठातील निर्यात संधींचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. कृषी निर्यात धोरण (चा भाग म्हणून अनेक एकमेव उत्पादन जिल्हे प्रभाग निर्यातीला चालना राबवण्यासाटी तयार करण्यात येणार आहेत. यासाठी सध्याचे उत्पादन, निर्यात संधी, उत्पादनची प्रमाणबद्धता, निर्यात मालाचे माप, भारताचा वाटा आणि निर्यातवाढीच्या संधी याची माहीती आणि आकडेवारी उलब्ध करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.